बदलत्या जीवनशैलीमुळे वाढला कॅन्सर चा धोका

वर्धा : झपाट्याने बदलणाऱ्या दैनंदिन जीवनात विविध प्रकारच्या रोगांचे प्रमाण अधिकाधिक वाढतच चालले आहे. या बदलत्या जीवनशैलीमुळे गेल्या ५ वर्षापासून कॅन्सर सारख्या जीवघेण्या रोगाचा प्रकोप वाढलेला आहे, असे कॅन्सर मिशन सोसायटी चे डॉ. किरण सोनेकर यांनी ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय कडून आयोजित करण्यात आलेल्या ब्रह्मकुमारी मेडिटेशन हॉलमध्ये कॅन्सर संबंधी जनजागृती शिबीर मध्ये व्यक्त केले होते.

डॉ. सोनेकरांनी सांगितले की, पुरुषांमध्ये मुखाचा आणि फेफड्यांचा कॅन्सर गतीने वाढतो. वेळेवर उपचार न मिळाल्याने कमी वयात रुग्णाचा मृत्यूदेखील होण्याशी शक्यता असते. यावर डॉ. नायडु ही मार्गदर्शन देत म्हणाले, मादक पदार्थ जसे तंबाखू, सिगारेट, बीडी, दारू हे कॅन्सर ला वाढवण्याचे तसेच शरीरात कॅन्सर पसरवण्याचे काम करतात. त्यांनी कॅन्सर ची तपस करण्याच्या अनेक प्रकारच्या टेस्ट बद्दल देखील लोकांना मार्गदर्शन केले. तसेच सर्व कार्यकर्त्यांनी सहकार्य करीत कार्यक्रम सुरळीतपणे पार पडला.