चमचमीत अंड्याची बिर्याणी

egg biryani

‘अंडा’ हे आपल्या आरोग्यासाठी पौष्टिक मानल जात. त्यामुळे रोज एक किंवा दोन अंडे हे खाल्लेच पाहिजेत. या शिवाय अंड्याची बिर्याणी देखील खूप स्वादिष्ट वाटेल. चिकन बिर्याणी, मटन बिर्याणी हे प्रकार तर आपण नेहमीच खात असतो. पण अंडा बिर्याणी मात्र क्वचितच खातो. मात्र हि बिर्याणी सुद्धा नेहमीच्या बिर्याणी सारखेच स्वादिष्ट वाटते आणि यात अंडा असल्यामुळे आपल्या आहारासाठी देखील तेवढेच फायदेशीर ठरते. चला तर मघ सुरु करूया….

साहित्य :- 

 • ४-६  अंडी
 • २०० ग्राम तांदूळ
 • १ मोठा बारीक कापलेला कांदा
 • १ बारीक कापलेले टोमॅटो
 • १ बटाटा बारीक चौकोनी कापलेला
 • अर्धी बारीक कापलेली भोपाली मिरची
 • १ बारीक कापलेली हिरवी मिरची
 • १ चमचा गरम मसाला
 • अर्धा चमचा आल्याची पेस्ट
 • अर्धा चमचा जिरे पावडर
 • १ चमचा हळद
 • अर्धा चमचा लाल मिरची पावडर
 • अर्धा चमचा धने पावडर
 • २ चमचे तूप
 • १ चमचा तेल
 • चवी पुरते मीठ
कृती :-  सर्वात आधी तांदूळ नीट धुवून घ्या. थोडा वेळ भिजत ठेवावा जेणे करून तांदुळाचा आकार वाढेल. तितक्या वेळेत अंडी उकडून घ्या. उकडलेल्या अंड्यांना काही ठिकाणी त्याच्या पांढऱ्या भागावर कापून त्यामध्ये हळद आणि मीठ टाका आणि अंडे तळून बाजूला ठेवा. नंतर एका भांड्यात तेल गरम करा. त्यात कापलेला कांदा आणि मिरची टाकून त्याचा रंग तपकिरी होई पर्यंत तळून घ्या. यानंतर त्यात कापलेले टोमॅटो, भोपाली मिरची आणि बटाटा टाका. आता ह्या मिश्रणाला मध्यम उष्णतेवर आणखी २-३ मिनिट तळावे. नंतर यात सर्व मसाले आणि मीठ टाकावे आणि उत्तम प्रकारे त्याचे मिश्रण करावे. आता धुतलेला तांदूळ एका पॅनमध्ये टाकावे व त्यात थोडे मीठ घालावे. तांदूळ आणि सर्व मसाले व्यवस्तीत एकत्र करावेत. शेवटी मिश्रणामध्ये आधी तयार केलेली अंडी टाकावीत. पुरेसे पाणी टाकून पॅन वर झाकण ठेवावे. २० मिनिटांसाठी त्याला शिजवून घ्या. भात शिजल्यावर व्यवस्थित मिक्स करून घ्या. तुमच्यासाठी अंड्याची बिर्याणी तयार आहे .