२० हजार वाहन चालकांना पाठवले घरपोच चालान

औरंगाबाद : गेल्या वर्षापासून राज्यात सक्तीने वाहतूक नियम लागू करण्यात आले आहे, तरीदेखील लोक त्याचे पालन करीत नाही. औरंगाबाद शहरात वाहतून नियम मोडणाऱ्या तब्बल २० हजार वाहन चालकांना वर्षभरात वाहतूक पोलिसांनी वाहन चालकाच्या छायाचित्रासह घरपोच चालान पाठविले आहेत.

विना हेल्मेट दुचाकीचालक, विना सीटबेल्ट वाहनचालक, विरुद्ध दिशेने येणारे, नो पार्किंगमध्ये वाहन उभी करणारे, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणारे ऑटोरिक्षाचालक, जीपचालक, नो एंट्रीमध्ये बेफिकिरीने वाहन चालवणारे, विना गणवेश आणि विना लायसन्स तसेच वाहनांची कागदपत्रे जवळ न बाळगणाऱ्या वाहन चालकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. परिणामी, वाहतूक चालकाला भूगदंड भरावा लागणार आहे.