भीम अॅप वापरणाऱ्यांसाठी कॅशबॅकची ऑफर

मुंबई : डिजीटल व्यवहार करण्यासाठी सरकारने सुरु केलेले भीम अॅप वापरणा-यांना आजपासून कॅशबॅकची ऑफर मिळणार आहे. यात सामान्य ग्राहकांना महिन्याला साडेसातशे रुपये आणि व्यावसायिकांना हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळू शकेल .

आंबेडकर जयंतीनिमित्त भीम अॅप बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांना समर्पित करण्यात आले आहे. आर्थिक व्यवहारांसाठी आणि डिजिटल व्यवहारांसाठी प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने सुरु केले आहे. हा आर्थिक व्यवहारांसाठी इंडियन नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन, भारत सरकारने सुरू केलेला उपक्रम आहे.

भारत इंटरफेस फॉर मनी, अर्थात भीम अॅप नॅशनल पेमेंट्स कॉरपोरेशन ऑफ इंडियाचालवते. हे अॅप केवळ २ एमबीचे आहे त्यामुळे काही सेकंदात डाऊनलोड होते. हे अॅप वापरणाऱ्यांसाठी बॅंक खाते आपल्या मोबाईल नंबरने जोडलेले असणे आवश्यक आहे.

अॅप प्रथमच डाऊनलोड केल्यानंतर ते अॅक्टीव्ह करा. आपल्या डेबिट कार्डची आवश्यकता आहे. अॅप डाउनलोड करताच 4 अंकी डिजिटल पासवर्ड तयार करावा लागेल. त्यानंतर, डेबिट कार्डावर देण्यात आलेल्या माहितीमध्ये प्रवेश करा. भीम अॅपचा वापर सर्व भारतीय भाषांव्यतिरिक्त हिंदी आणि इंग्रजीमध्ये होऊ शकतो.

 

Facebook Comments