उन्नाव, कठुआ बलात्कार प्रकरणांविरोधात वर्धा कॉंग्रेस तर्फे काढण्यात आला कँडल मार्च

वर्धा: उन्नाव, कठुआ बलात्कार प्रकरणांविरोधात महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष चारुलता टोकस यांनी शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत शहरातील बजाज चौकातून कँडल मार्च काढत निषेध नोंदविला.

या कँडल मार्च मध्ये महिलांसह नागरिकांची उपस्थिती होती. दरम्यान या बलात्काराच्या आरोपींना सरकार पाठीशी घालत असून सरकारने आरोपींना अटक करत फाशीची शिक्षा द्यावी,अशी मागणीही यावेळी चारुलता टोकस यांनी केली.