कठुआ-उन्नाव ‘निर्भया’साठी राहुल गांधींचा इंडिया गेटवर रात्री 12 वाजता कँडल मार्च

नवी दिल्ली : केंद्राच्या मोदी सरकारमध्ये महिलांची असुरक्षा तसेच निर्लज्ज घटनांची वाढ झाल्याने काँग्रेस अध्य आज रात्री 12 वाजता कँडल मार्च करतील. यासाठी दिल्ली प्रदेश काँग्रेस कार्यालयाकडून सर्व काँग्रेस नेत्यांना निमंत्रण पाठविण्यात आले आहे.

उन्नाव तसेच कठुआ येथील बलात्काराच्या घटनेविरुद्ध हा कँडलमार्च प्रदेश कार्यालयाकडून काढण्यात येत असून यासाठी रात्री 11 वाजता सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांना कार्यलायत बोलाविण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार मार्च मध्ये राहुल गांधी, अजय माकन आणि परिष्ठ काँग्रेस नेत्यांसह अनेक माजी मंत्रीही सहभागी होतील.

एवढेच नव्हे तर दिल्ली सरकारमधील विद्यमान आणि माजी नगरसेवक, सर्व ब्लॉक अध्यक्ष, महिला काँग्रेस. युवक काँग्रेस, सेवा दल, जिल्हा काँगेस कमेटीचे पदाधिकारी एनएसयुआय आणि अनुसूचित जाती, जमातीच्या तसेच सर्व ब्लॉक कार्यकारिणी उपस्थित राहतील. मार्च दिल्ली प्रदेश काँग्रेस कमेचीच्या कार्यालयातून रात्री 11 वाजता सुरु होईल आणि इंडिया गेटवर पोहचेल.