भाजपा खासदार म्हणाले, दिग्विजय सिंह यांनी दिल्लीहून ‘आयटम’ आणला

देवास : मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंह यांनी राज्यासाठी काहीही केले नाही. मात्र दिल्लीहून एक ‘आयटम’ घेऊन आले आणि नर्मदा यात्रेसाठी निघून गेल्याचे आक्षेपार्ह विधान भाजपा खासदार मनोहर उंटवाल यांनी केले. ऊंटवाल जेव्हा बोलत होते तेव्हा व्यासपीठावर दोवासच्या महिला आमदार गायत्री राजे पवार, मंत्री दीपक जोशीसह अनेक भाजपा नेता उपस्थित होते.

उल्लेखनीय आहे कि दिग्विजय सिंह 3 हजार किलोमीटरची लांब नर्मदा परिक्रमा 9 एप्रिल रोजी नरसिंहपूर जिल्हाच्या बर्मन घाटावर समाप्त झाली. 70 वर्षांचे सिंह आणि त्यांची पत्नी अमृता यांनी नरसिंहपूर जिल्ह्यापासून परिक्रमा यात्रा सुरु केली होती. तथापि, नंतर ऊंटवाल आपल्या वक्तव्यापासून फिरले. एएनआयच्या एका ट्विटनुसार ऊंटवाल म्हणाले कि, त्याचे वक्तव्य चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आले. ते म्हणाले कि मी दिग्विजयसिंह आणि महिलांचा फार सन्मान करतो.