काँग्रेसचे आमदार राहत असलेल्या रिसॉर्टमधे भाजपा नेत्यांचा प्रवेश

बंगरुळु : कर्नाटकात सत्ता स्थापनेचा वाद चांगलाच चिघळला असून, भाजपाकडूनसत्ता स्थापन करण्यासाठी घोडेबाजार होत असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. आपल्या आमदारांनी पक्षातून बाहेर पडून भाजपला मदत करू नये यासाठी काँग्रेसने त्यांना इलिंग्टन रिसॉर्ट येथे रवाना केले होते. मात्र, या रिसॉर्टबाहेरील पोलिस बंदोबस्त हटवताच भाजपाचे नेते तिथे पोहोचले आणि त्यांनी काँग्रेसच्या आमदारांना पैशांचं आमिष दाखवल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेस नेते रामलिंगा रेड्डी यांनी केला आहे.

दरम्यान, घोडेबाजार रोखून भाजपाला सत्ता स्थापन न करता यावी यासाठी काँग्रेसने आता आपल्या आमदारांना इलिंग्टन रिसॉर्ट येथून कर्नाटकाबाहेर पाठवण्याचा निर्णय घेत त्यांना हैदराबाद आणि कोच्ची येथे रवाना केल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार, जेडीएसच्या आमदारांनी बंगळूरूंना शांग्रिला हॉटेलमधून बाहेर पडले आहेत. तसेच काँग्रेस आणि जेडीएसच्या काही आमदारांना केरळातील कोची आणि काही जणांना आंध्रप्रदेशातील हैदराबाद येथे पाठवण्यात आल्याचे जेडीएसचे आमदार शिवरामे गौडा यांनी सांगितले आहे.