कमळ गाडणारच : आदित्य ठाकरेचा निर्धार

पालघर : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा यांचा सध्या मोठ्या उत्सहाने शिवसेनेतर्फे प्रचार सुरु आहे . या प्रचारामध्ये युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे बुधवारी सहभाग नोंदविला . आदित्य ठाकरे यांचाआज पालघर ग्रामीणमध्ये रोड शो आयोजित करण्यात आला होता. आदित्य ठाकरे यांनी या रोड शो च्या दरम्यान शिवसैनिकांशी संवाद साधला

ही लढाई नैतिकतेची आहे . “श्रीनिवास वनगा हे जिंकून दिल्लीत जाणार याचा आम्हाला विश्वास आहे . याकरिता आम्ही यावेळेस या वेळेस कमळ गाडणार म्हणजे गाडणारच, श्रीनिवास वनगांचा विजय निश्चित आहे”, असा शब्दात आदित्य ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना संबोधले आणि त्यांना प्रेरित केले .