मुंबईच्या प्रभादेवी भागातील बिल्डिंगला भीषण आग

मुंबई: प्रभादेवीतील वीर सावरकर रोडवरील ब्यूमॉन्ट बिल्डिंगला दुपारी दोन वाजता आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या 10 गाड्या आणि 3 वॉटर टँकर घटनास्थळी रवाना झाले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु आहे. या आगीत बिल्डिंगमध्ये काही लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. याच बिल्डिंगमध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोण हीचं घर आणि ऑफिसही असल्याचे कळते. या इमारतीच्या 26 व्या मजल्यावर दीपिकाचा 4 बीएचकेचा फ्लॅट आहे. याशिवाय बिजनेसमॅनची आॅफिसेस या इमारतीत आहे.

ही आग कशामुळे लागली याबाबतची माहिती अद्याप मिळू शकली नाही. अग्निशमनदलाला या आगीची माहिती दुपारी 2 वाजून 16 मिनिटांनी मिळाली.

बो मोंड इमारतीच्या 33 व्या मजल्याला आग लागली असली, तरी फायर ब्रिगेडकडे तेवढ्या उंचीची शिडीच उपलब्ध नाही. त्यामुळे ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला मोठी कसरत करावी लागत आहे.

दरम्यान, या इमारतीतून जवळपास 100 जणांची सुखरुप सुटका केली आहे. 6 फायर इंजिन, 5 जंबो टँकर आणि अॅम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल आहेत.