विधानमंडळ सदस्यांसाठीचे उत्कृष्ट संसदपटू, उत्कृष्ट भाषण पुरस्कार जाहीर

मुंबई : महाराष्ट्र विधानमंडळातील राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेतर्फे दिल्या जाणाऱ्या विधान परिषद अणि विधान सभा अशा दोन्ही सभागृहातील सन 2015 ते 2018 या कालावधीतील उत्कृष्ट संसदपटू आणि उत्कृष्ट भाषण अशा दोन्ही पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधान सभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे सभागृह नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट, महाराष्ट्र विधानमंडळाचे सचिवालयाचे प्रधान सचिव आणि राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेचे पदसिद्ध सचिव डॉ. अनंत कळसे आणि ज्येष्ठ पत्रकार सुकृत खांडेकर यांच्या निवड समितीने ही निवड केली आहे.

पुरस्कार प्राप्त सन्माननीय सदस्य

विधान सभा :

सन 2015-16

उत्कृष्ट संसदपटू

उत्कृष्ट भाषण

डॉ. अनिल बोंडे

प्रा. वर्षा गायकवाड

सन 2016-17

उत्कृष्ट संसदपटू

उत्कृष्ट भाषण

सुभाष साबणे

राजेश टोपे

सन 2017-18

उत्कृष्ट संसदपटू

उत्कृष्ट भाषण

राहुल कुल

धैर्यशील पाटील

विधान परिषद :

सन 2015-16

उत्कृष्ट संसदपटू

उत्कृष्ट भाषण

ॲड. अनिल परब

ॲड. राहुल नार्वेकर

सन 2016-17

उत्कृष्ट संसदपटू

उत्कृष्ट भाषण

विजय ऊर्फ भाई गिरकर

कपिल पाटील

सन 2017-18

उत्कृष्ट संसदपटू

उत्कृष्ट भाषण

संजय दत्त

प्रवीण दरेकर