बारामती काँग्रेस लढणार! म्हणजे आमचे डिपॉझिट जप्त : अजित पवार यांची खोचक टीका

पुणे: पुण्यातील हल्लाबोल आंदोलनात कपुण्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढणार, अशी घोषणा राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी केल्यानंतर काँग्रेसने म्हटले होते कि आमची ताकद बारामतीत वाढली आहे. त्यामुळे बारामती लोकसभेची जागा आमचा पक्ष लढवेल, असे काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष देवीदास भन्साळी यांनी म्हटल्यानंतर त्यांच्या या वक्तव्यावर अजित पवारांनी पुण्यात झालेल्या पत्रपरिषदेत काँगचची चांगलीच खिल्ली उडवली होती. पवार म्हणाले, अरे बापरे! काँग्रेसचा उमेदवार बारामती लोकसभा मतदारसंघातून आता लढणार म्हणजे आमचं डिपॉजिटचं जप्त होणार की राव…. अशी खोचक टिप्पणी केली.

काँग्रेसकडे असलेली पुणे शहरातील लोकसभेतील जागा आतापर्यंत राष्ट्रवादीने कधीही लढविली नाही. 2009 साली काँग्रेसचे खासदार सुरेश कलमाडी पुण्याचे खासदार होते. मात्र मोदी लाटेत भाजपाने ही जागा खेचून आणली. आता पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील काँग्रेसची संघटन पातळीवर अवस्था खूपच वाई आहेत. त्या तुलनेत राष्ट्रवादीची संघटनात्मक ताकद मोठी आहे. त्यामुळे पुण्यातील जागा राष्ट्रवादी लढण्यास उत्सुक आहे.

2014 साली युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम यांनी पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढविली होती. परंतु त्यांचा 3 लाखाहून अधिक मतांनी पराभव झाला होता. त्यामुळे कदम आगामी लोकसभा निवडणुक पुण्याऐजवजी सांगलीमधून लढविण्यास उत्सुक आहे. त्यामुळे पुण्यात काँग्रेसच्या उमेदवाराचा शोध सुरु असताना अजित पवारांनी पुणे लोकसभा मतदार संघावर दावा केला आहे.

पुण्याची लोकसभा आपल्या ताब्यात घेऊन भंडारा-गोंदिया ही राष्ट्रवादीची जागा काँग्रेसच्या नाना पटोलेंना सोडण्याचा विचार पक्ष करत आहे. येत्या काही दिवसातच तेथे पोटनिवडणूक होत आहे. राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल राज्यसभेवर निवडून गेले आहेत. त्यांची मुदत जून 2020 पर्यंत आहे. शिवाय नाना पटोलेंसमोर पटेल यांचा निभाव लागेल की नाही याचा कोणताही भरवसा पक्षाला नाही त्यामुळे ही अदलाबदल करावी असे अजित पवारांना वाटत आहे. त्यामुळेच त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

2019 मध्ये पुणे लोकसभा भाजपच जिंकेल. ही जागा काँग्रेस लढो की राष्ट्रवादी भाजपचा विजय 3 लाखांहून अधिक मतांनी होणार हे स्पष्ट आहे, असे भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी या वादावर भाष्य करताना प्रतिक्रिया दिली आहे.