औरंगाबाद दंगल पूर्वनियोजित : प्राथमिक अहवाल

औरंगाबाद : शहरात नुकतीच झालेली दंगल पूर्वनियोजित होती, असे पोलिसांच्या प्राथमिक अहवालात म्हटले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

शहरावर वर्चस्व ठेवण्यासाठी दोन राजकीय पक्षात चढाओढ सुरू आहे. त्यातून नियोजनबद्ध पद्धतीने सगळं घडलं असल्याचं पोलिसांच्या एसआयटीने केलेल्या तपासात लक्षात आलं असे सूत्रांनी म्हटले. ही दंगल पूर्वनियोजित असल्याचा निष्कर्श काढण्यासाठी अनेक कारणं पोलिसांकडे आहेत.

या माहितीच्या आधारे तपास सुरू आहे. या दंगल प्रकरणात आतापर्यंत शिवसेनेच्या दोन तर एम आय एम च्या एका नेत्यासह दोन्ही पक्षाच्या १० पेक्षा जास्त कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. आज या दोन्ही पक्षाच्या या आणखी काही मोठ्या नेत्यांना अटक होण्याची शक्यता आहे.