पोलिसाच्या घरात शिरलेल्या बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू

नागपूर : हिंगणा परिसरातील डिगडोहमध्ये एका घरात बिबट्या शिरल्याने खळबळ उडाली आहे. ए. जी. बायस्कर यांच्या घरात सकाळी बिबट्या शिरला. तेव्हापासून त्याने घरातील बाथरुममध्ये ठाण मांडले आहे.

वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून बिबट्याला बेशुद्ध करुन पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परिसरात बिबट्या शिरल्याचे कळताच लोकांनी बायस्कर यांच्या घरासमोर गर्दी केली आहे.