वेटटलिफ्टर पूनम यादववर हल्ला

वाराणसी : राष्ट्रकुल स्पर्धेत वेटलिफ्टिंगमधे सुवर्णपदक पटकावणाऱ्या पूनम यादवसह तिच्या कुटुंबावर हल्ला करण्यात आला. हा हल्ला जुन्या वादातून झाल्याचं कळते .

या बाबतची हकीगत अशी की, राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावल्यानंतर पूनम यादव वाराणसीला आल्यावर आशीर्वाद घेण्यासाठी आत्याच्या घरी गेली. त्यावेळी एका जुन्या वादावरुन गावातल्या लोकांनी तिच्या आत्यासह पूनम आणि तिच्या चुलत भावांवर प्राणघातक हल्ला केला.

या हल्ल्यात पूनमचे चुलत भाऊ चांगलेच जखमी झाले आहेत. पूनमला संरक्षण देण्यासाठी उपस्थित असलेल्या पोलिसांनी तिला या हल्ल्यातून वाचवले.

या हल्ल्यात परिसरात मोठी तोडफोड करण्यात आली. अनेक गाड्यांचं मोठे नुकसान झालं आहे. या घटनेनंतर जिल्हा पोलीस अधिक्षक घटनास्थळी गेले. सध्या पोलिसांनी तिला संरक्षण दिलं असून हल्लेखोरांवर पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पूनम यादवने ६९ किलो वजन गटातून सुवर्ण पदक पटकवले आहे.