आशिष शेलार – राज ठाकरे यांची ‘कृष्णकुंज’वर भेट

मुंबई : मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज सकाळी, राज ठाकरेंचे निवासस्थान ‘कृष्णकुंज’वर भेट घेतली.

राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यात नेमकी काय चर्चा झाली, याबाबतचा तपशील समोर आलेला नाही. किंबहुना, मनसे किंवा भाजपच्या कोणत्याही नेत्याने यासंदर्भात माहिती दिली नाही.

राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यात झालेल्या या भेटीमागे नक्की काय कारण होते, याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. राज ठाकरे हे मनसेचे पक्षप्रमुख, तर आशिष शेलार हे मुंबई भाजपाचे अध्यक्ष आहेत, त्यामुळे राजकारणातील दोन महत्त्वाच्या पदांवरील या नेत्यांच्या भेटीला नक्कीच मोठे महत्त्व आहे, आणि त्याबाबत चर्चा सुरु आहे.