आंबेडकर जयंती निमित्य बेस्टच्या अतिरिक्त बसफेऱ्या

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७व्या जयंतीनिमित्त आज बेस्ट प्रशासनातर्फे विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. चैत्यभूमीकडे दर्शनासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी बेस्टतर्फे जादा बसफेऱ्या चालवण्यात येणार आहेत तर शहराच्या विविध भागांतील डॉ. आंबेडकर यांची स्मृतिस्थळ, वास्तूंना भेटदेऊ इच्छिणाऱ्यांसाठी विशेष स्थळदर्शन फेऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे.शिवाजी पार्क येथून डॉ. आंबेडकर यांची स्मृतिस्थळे, वास्तूंना भेट देण्यासाठी चालवण्यात येणाऱ्या सेवेसाठी प्रतिप्रवासी १५० रुपयेप्रवासभाडे आकारले जातील.

या बसफेऱ्या सकाळी ८ ते रात्री १० दरम्यानप्रत्येक अर्ध्या तासाने चालवण्यात येणार आहेत. याची तिकिटे चैत्यभूमी,शिवाजी पार्क बसचौकी, वीर कोतवाल उद्यान येथे उपलब्ध आहेत.