बौद्ध मंगल परिणय (विवाह) कायद्याच्या मसुद्यासंदर्भात हरकती व सूचना करण्याचे आवाहन

मुंबई : राज्यातील बौद्ध समाजासाठी बौद्ध मंगल परिणय (विवाह) कायद्याचा मसुदा सामाजिक न्याय विभागाच्या https://sjsa.maharashtra.gov.in व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे, यांच्या http://www.barti.in या संकेतस्थळावर एक महिन्याकरिता प्रसिद्ध करण्यात आला आहे. या कायद्याच्या तरतुदींबाबत जनतेच्या काही हरकती किंवा सूचना असल्यास त्या ऑनलाईन पद्धतीने नोंदविण्याचे आवाहन सामाजिक न्याय विभागाचे अवर सचिव यांनी केले आहे.