मुख्यमंत्र्यांच स्वप्न कुणीही बघू शकतो; अशोक चव्हाणांचा अजित पवारांना टोला

मुंबई : अजितदादांना मुख्यमंत्री करायचंय हे ध्यानात ठेवा. हे करण्यासाठी केवळ बसून, सभेला येऊन, भाषणे ऐकून ते शक्य होणार नाही. त्यासाठी गल्लोगल्ली जा, घराघरांत जाऊन प्रत्येक माणसाला “राष्ट्रवादी’ विचार पटवून सांगा, असे भावनात्मक आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँगेस पक्षातर्फे काढण्यात आलेल्या हल्लाबोल यात्रेदरम्यान केला होता. मात्र त्यांच्या य विधानानंतर काँग्रेसने अजित पवारांच्या नेतृत्वाबाबत हात झटकले आहेत. अजित पवारांनी नेतृत्व करावं की हे राष्ट्रवादीचे स्वतःचे मत आहे. असे म्हणत मुख्यमंत्रिपदाची स्वप्न कुणालाही पडू शकतात असा सुचक टोला काँग्रेसचे देशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी अजित पवारांवर लगावला आहे.

हल्लाबोल यात्रेनिमित्त संपन्न झालेल्या जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचं महाराष्ट्रातलं नेतृत्त्व अजित पवारांकडेच असणार हे खुद्द सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानंतर अनेक चर्चांना सुरूवात झाली होती. त्यांनी केलेल्या विधानानंतर सर्वच स्तरावरून चर्चा होऊ लागल्या आहे. अजित पवार मुख्यमंत्री होतात की काय अशी चर्चाही रंगायला लागली होती. यावर काँग्रेसच काय मत आहे याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं. त्यावर आपली प्रतिक्रिया देतांना अशोक चव्हाण यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सावध भूमिका घेत त्यावर अधिक भाष्य करणं टाळलं. हा सर्वस्वी राष्ट्रवादीचा पक्षांतर्गत मामला असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच निवडणूक होण्याआधी असं काही बोलणं मला योग्य वाटत नाही अशी सुचक टिप्पणीही त्यांनी केली.

दरम्यान, पुढे होणाऱ्या निवडणुकीत केंद्रातील आणि राज्यातील भाजपाच्या सरकारला सत्तेतून बेदखल करण्यासाठी विरोधी पक्षांनी प्रयत्न सुरु केले आहेत. मोदींविरोधात समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी यापूर्वीच म्हटले आहे. त्यामुळे पुढे होणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.