अण्णा हजारेंनी सोबत असलेल्यांवर लक्ष ठेवावे – रामदेव बाबा

सातारा : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारेंनी आंदोलन करावं यासाठी पुढाकार घेत मी त्यांना आंदोलनासाठी मी उभं केलं होतं. अण्णा हजारे चांगले व्यक्तिमत्व आहे, मात्र सोबत असणाऱ्या लोकांवर त्यांनी लक्ष ठेवावे, असा सल्ला योगगुरू रामदेवबाबा यांनी दिला. कऱ्हाड येथे डॉ. अतुल भोसले युवा प्रतिष्ठानच्या वतीने शनिवारी आयोजित योग शिबिरात ते बोलत होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती दिनानिमित्त रामदेवबाबा म्हणाले की, महापुरुष हे संपूर्ण देशाचे असतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कुठल्या एका समाजासाठी काम केले नसून त्यांनी सर्वांसाठी काम केलं. समाजात सामाजिक न्याय आणि समता निर्माण व्हावी, यासाठी त्यांचे मोठे योगदान आहे.