‘अण्णा ‘ म्हणणारा कोंबडा दिसेल सिनेमात

सांगली : सांगली जवळच्या आळसंद गावातल्या एका कोंबड्याला पकडले तर तो ‘ अण्णा , अण्णा ‘ ओरडतो! कर्नाटकमधील एका दिग्दर्शकाने त्याला सिनेमात घेण्याची ऑफर दिली आहे.

गावातले लोक या कोंबड्याच्या मालकाला ‘अण्णा ‘ म्हणून ओळखतात, त्यामुळे गावात हा कौतुकाचा विषय ठरला.
एका वृत्त वाहिनीने या कोंबड्याची बातमी दाखवल्यांनतर तो प्रसिद्धीच्या झोतात आला. परिसरातले लोक हा कोंबडा पाहण्यासाठी आळसंदला येऊ लागले. बीडमधील काही लोक या कोंबड्यावर शॉर्ट फिल्म बनवणार आहेत. आणि आता त्याला सिनेमाची ऑफर आली आहे!

अनेकांनी अण्णांकडे तो कोंबडा विकत मागितला , पण अण्णा कोंबडा विकायला तयार नाही मात्र त्याला सिनेमात काम करू देण्यास अण्णांनी होकार दिला आहे.

एका कोंबड्यामुळे गावाचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचल्याने, आळसंद गावातील लोकांसाठी तो कौतुकाचा विषय ठरला आहे.