मराठी भाषा भवनच्या मुख्य केंद्र उभारणी करिता स्वतंत्र समिती स्थापन

मुंबई : मराठी भाषा भवनच्या मुख्य केंद्र उभारणी करिता मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचा कालावधी तीन महिन्याचा असणार आहे.

मराठी भाषा मंत्री विनोद तावडे हे समितीचे अध्यक्ष असतील. आमदार आशिष शेलार यांच्यासह सुरेश हावरे, मोनिका गजेंद्रगडकर, भरत जाधव, किशोर कदम यांचा समितीमध्ये समावेश करण्यात आली आहे. मराठी भाषा विभागाचे प्रधान सचिव या समितीचे सदस्य सचिव असतील. समिती भाषा भवनच्या मुख्य केंद्राच्या उभारणीसाठी दक्षिण मुंबई/वांद्रे-कुर्ला संकुल या परिसरातील राज्य शासनाच्या ताब्यातील रिक्त जागांची माहिती घेईल. योग्य जागेची निवड करुन राज्य शासनास त्याबाबत शिफारस करतील.