अमृतसर- नांदेड रेल्वे चार दिवस रद्द

अकाेला: अमृतसर-नांदेड मार्गावर मेगा ब्लॉक राहणार असल्यामुळे या मार्गावर धावणारी नांदेड- अमृतसर आणि अमृतसर-नांदेड या रेल्वे गाड्या चार दिवसांकरिता रद्द करण्यात आली आहे. उत्तर रेल्वेच्या अमृतसर रेल्वे स्थानकावर नॉन-इंटर लॉक वर्किंग आणि त्यापूर्वीची तयारी करण्याकरिता 19 जुलै ते 31 जुलै या कालावधीत रेल्वे मार्गावर हा मेगा ब्लॉक राहणार आहे. त्यामुळे या मार्गावरील अकाेल्यातील प्रवाशी प्रभावीत हाेणार आहेत.

परिणामी गाडी क्रमांक 12421 नांदेड येथून अमृतसरला जाणारी साप्ताहिक गाडी 25 जुलै आणि 01 ऑगस्ट रोजी रद्द करण्यात आली आहे. ही रेल्वे गाडी देखील अकाेला मार्गे धावणारी आहे. तसेच अकाेला मार्गे धावणारी गाडी क्रमांक 12422 अमृतसर-नांदेड साप्ताहिक एक्स्प्रेस 23 जुलै आणि 30 जुलै राेजी रद्द करण्यात आली आहे. तर गाडी क्रमांक 12715/12716 अमृतसर- नांदेड -अमृतसर सचखंड एक्स्प्रेस या दिवशी नियमित वेळेवर धावणार अाहे.