अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’ चित्रपटाचे पोस्टर रिलीज

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा आगामी चित्रपट ‘गोल्ड’ चं पोस्टर रिलीज झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून मीडियामध्ये अक्षयच्या ‘गोल्ड’ चित्रपट सतत चर्चे आहे. या पोस्टरमध्ये अक्षय कुमार भरपबर सीरियस लूकमध्ये दिसत आहे. अक्षय कुमारने काही वेळापूर्वीच पोस्टर रिलीज केले . या पोस्टरमध्ये चित्रपटाची तारीख 15 ऑगस्ट असल्याचे स्पष्ट करण्यात आली आहे. छोट्या पडद्यावरील नागीण फेम मौनी रॉय हि याच चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करते आहे.

पहिल्यांदाच यात संपूर्ण हॉकी टीम दाखवण्यात आली आहे. याआधी जे पोस्टर रिलीज झाले होते यात फक्त अक्षय कुमार दिसला होता. हा चित्रपट देश स्वतंत्र झाल्यानंतर मिळालेल्या पहिल्या ऑल्पिमिंक गोल्ड मेडलवर आधारित आहे. भारताना 1948 साली हॉकीमध्ये गोल्ड जिंकले होते. काही दिवसांपूर्वी चित्रपटाची शूटिंग लंडनमध्ये सुरू झाली आहे.

चित्रपटाच्या सेटवरचे शूटिंग दरम्यानचे काही फोटो व्हायरल झाले होते. हा चित्रपट 15 ऑगस्ट 2018 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात अक्षय कुमार बलबीर सिंग यांची भूमिका साकारतो आहे. भारताला हॉकीमध्ये गोल्ड मेडल मिळले तेव्हा भारतीय हॉकी संघाचे कर्णधर बलबीर सिंग होते. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑल्पिमिंकमध्ये तीन वेळा गोल्ड मेडल जिंकले आहे.