अक्कल दाढ दुखतेय ? मग हे करा उपाय

wisdom tooth

दातांच्या शेवटी येणारा दात म्हणजे अक्कल दाढ. अनेक लोकांना अक्कल दाढ ही १७ ते २५ वयादरम्यान येते. तर काही लोकांना ही २५ वयानंतरही येते. अक्कल दाढ येतांना फार वेदना होतात. इतक्या की खाणं-पिणंही बंद होतं. या वेदना थांबवण्यासाठी काही खास घरगुती उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

  • अक्कल दाढ आल्याने हिरड्यांमध्ये सूज आली असेल तर कोमट पाण्यात मिठ टाकून गुरळा करा. मिठ घातलेल्या या पाणाने केवळ २ ते ३ मिनिटेच गुरळा करा. याने वेदना कमी होतील.

  • जर दातांमध्ये वेदना होत असतील तर बर्फाचे छोटे छोटे तुकडे करुन दातांजवळ ठेवा. याने वेदना आणि हिरड्यांची सूज कमी होईल. सूज आणि वेदना पूर्णपणे बंद होईपर्यंत हा उपाय करा.

  • चिमुटभर हिंग मोसंबीच्या रसात मिश्रित करुन कापसाच्या मदतीने अक्कल दाढेजवळ ठेवा. याने वेदना कमी होतील आणि अक्कल दाढेचा इतर दातांवर प्रभावही होणार नाही.

  • लवंगमध्ये दातामधील बॅक्टेरिया आणि किटाणू नष्ट करण्याची क्षमता आहे. अशात अक्कल दाढेमुळे वेदना होत असतील तर त्या दाढेजवळ लवंग ठेवल्यास वेदना कमी होतील.

  • जर तुम्हाला अक्कल दाढेचा त्रास होत असेल तर कांद्याचा तुकडा दाताजवळ ठेवून चावा. याने तुम्हाला आराम मिळेल. कांद्यामध्ये दातांमधील किटाणू नष्ट करण्याचे गुण आहेत. यामुळे दातांच्या समस्या कमी होतात.