अजितदादा, तोंड उघडायला लावू नका; आ. शंभुराज देसाईंचा इशारा

सणबूर : आमदार शंभुराज देसाई अजित पवारांना इशारा देताना म्हणाले, दादा पाटणमध्ये येऊन कुणाला तरी खूश करण्यासाठी माज्यावर बेतालपणे बोलत असाल तर मला तोंड उघडायला लावू नका, माझ्याकडे बरेच बोलण्यासारखे बरेच आहे, हे विसरू नका.

आमदार देसाई म्हणाले, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत केलेली मदत दादा विसरले का? पाटणमध्ये येऊन तुम्ही माझ्यावर वैयक्तिक बोलावे, यासाठी मार्गदर्शन कोणाचे आहे, हे न कळण्याइतपत मी कच्चा राजकारणी नाही. मी सयंम बाळगून आहे.

मी आजपर्यंत बरंच काही मनात साठवून आहे, ते एकदा बाहेर काढायला सुरूवात केल्यास तुम्हाला सहन होणार नाही. पदवीधर निवडणूकीत सारंग पाटील यांच्या विरोधात कोणी प्रचार केला? शिवाय त्यांच्याच गावात मारूलमध्ये कोणी टेबल लावले हे तालुक्यातील जनता विसरलेली नाही. पाटणमध्ये येऊन कोणाचे तरी ऐकून त्यांना बरं वाटावं म्हणून माझ्यावर वैयक्‍तिक बोलत असाल, तर माझ्याही काही मर्यादा आहेत, त्या ओलांडायला लावू नका.जिल्ह्यात वाई, उंब्रज, दहीवडी,सातारा येथील हल्लाबोलची आंदोलने बघा आणि त्यांच्या तुलनेत पाटणचे हल्लाबोल आंदोलन बघा, फरक तुमच्याच लक्षात येईल.

 

Facebook Comments