अजय देवगण फुटबॉल प्रशिक्षकाच्या भूमिकेत

मुंबई : भारताचे फुटबॉलपटू अब्दुल रहीम यांच्या आयुष्यावर चित्रपटाची निर्मिती बोनी कपूर, आकाश चावला व जॉय सेनगुप्ता ही मंडळी करणार आहेत. तसेच या आगामी चित्रपटात अभिनेता अजय देवगण मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा सुरु आहे.

अब्दुल रहीम हे भारतीय फुटबॉलचे वास्तुकार म्हणून ओळखले जातात. तसेच अब्दुल यांची फुटबॉलमधील कारकीर्द हिंदूस्थानाकरता स्वर्ण युग म्हणून मानली जाते. एवढेच नसून त्यांच्या मार्गदर्शनाखाली १९५६ साली मेलबर्न ओलिम्पिक फुटबॉल स्पर्धेमध्ये हिंदूस्थानाची टीम उपात्यं फेरीत जाऊन पोहचली होती. बोनी कपूर यांना अब्दुल रहीम यांच्या आयुष्यावर चित्रपट येणार असल्याचे सांगितल्यावर, रहीम यांच्या सारख्या भारताच्या महान फुटबॉलपटूवर चित्रपटातची निर्मिती करणे महत्वाचे ठरेल असं बोनी कपूर यांनी स्पष्ट केले आहे.

या चित्रपटातून अजय देवगण मुख्य भूमिका साकारणार असला तरीही सहकलाकारांची नावं अद्याप समोर आली नाही आहेत.