अहमदनगर येथे सहाय्यक फौजदारची गळफास घेऊन आत्महत्या

अहमदनगर : येथे स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार यांनी आज सकाळी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. मृत फौजदारचे नाव कृष्णा वाघमारे असे असून, यांनी सावेडीतील जाँगिंग ट्रकच्या मैदानावरील झाडाला लटकून आत्महत्या केली.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी सावेडीतील जाँगिंग ट्रकच्या मैदानावरील झाडाला लटकलेल्या अवस्थेत कृष्णा वाघमारे यांचा मृतदेह आला. तसेच, त्यांच्या मृतदेहाजवळ त्यांनी लिहिलेही चिठ्ठीदेखील पोलिसांना मिळाली. या चिठ्‌ठीमध्ये ‘माझ्या आत्महत्येस कोणी जबाबदार नाही’, असे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे. मात्र, त्यामुळे सहाय्यक फौजदार वाघमारे यांच्या आत्महत्येमागचे नेमके कारण समजू शकले नाही. वाघमारे हे एक महिन्‍यानंतर सेवानिवृत्त होणार होते. याप्रकरणी तोफखाना पोलिसात या घटनेची नोंद झाली आहे.