भाजपाच्या यशानंतर प्रकाश राजची नेटकऱ्यांकडून धुलाई

बेंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत चित्रपट अभिनेता प्रकाश राज भाजपाच्याविरुद्ध प्रचारात उतरले होते. त्यांनी भाजपा आणि मोदींविरुद्ध जहरी टीका केली होती. आता निकालानंतर भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आल्यानन्तर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी त्यांची धुलाई सुरू केली आहे.

प्रकाश राज आता कुठे लपून बसले आहेत, ‘कोणीतरी त्यांना शोधा’, अशा आशयाचे ट्विट अनेकांनीच केले आहेत. तर काहींनी त्यांचे मिम्स बनवत त्यांना विनोदी अंगाने सादर केलं आहे. कोणी त्यांच्या ‘सिंघम’ चित्रपटातील ‘और बढाओ भाईचारा’ या वाक्याची मदत घेत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. तर कोणी आणखी वेगळ्या पद्धतीने त्यांना ट्रोल केले आहे.

कानडी जनतेने भाजपाला मतं देऊ नये असं आवाहन प्रकाश राज केलं होतं. भाजपाविरुद्ध वातावरण तापवण्यासाठी त्यांनी पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा भावनात्मक खूप रेटला होता.

मोदींवर टीका केल्यामुळे मला हिंदी चित्रपटसृष्टीत काम मिळणं बंदच झालं आहे, दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत ही अडचण अजूनतरी आलेली नाही असा आरोपही प्रकाश राज याने केला होता. निवडणुकीत सारखं बोलणारे प्रकाश राज सध्या एकदम शांत आहेत!