कर्नाटक निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेलची दुसरी दरवाढ

नवी दिल्ली : कर्नाटकच्या निवडणुकीमुळे 24 एप्रिलपासून स्थिर असलेले पेट्रोल आणि डिझेलच्या पुन्हा वाढू लागले आहेत. आता पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 15 पैसे, आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 21 पैसे वाढ करण्यात आली आहे. आज सकाळपासूनच नवे दर लागू होतील.

कर्नाटक निवडणुकीचं मतदान संपल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे.

कर्नाटक निवडणुकीच्या काळात 24 एप्रिलपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर जैसे थे होते. मात्र मतदान संपताच 14 मे रोजी पहिली दरवाढ करण्यात आली होती. पेट्रोल प्रति लिटर 17 पैसे, तर डिझेल प्रति लिटर 21 पैशांनी महागलं होतं.

इंधनाचे दर दररोज बदलतात. मात्र 24 एप्रिलनंतर म्हणजेच कर्नाटक निवडणुकीदरम्यान या दरांमध्ये बदलच झाले नव्हते.
या दरवाढीनंतर देशातील मुख्य शहरात पेट्रोल – डिझेलचे दर पुढीलप्रमाणे रहातील.

पेट्रोल : मुंबई – 82.94, दिल्ली – 75.10, कोलकाता – 77.79, चेन्नई – 77.93 रुपये.
डिझेल : मुंबई – 70.88, दिल्ली – 66.57, 69.11 रुपये, चेन्नई – 70.25 रुपये.