अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांना ८ लाखांची लाच घेताना अटक

ठाणे : कल्याण-डोबिंवली महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांना ठाणे लाचलुचपत विभागाने ८ लाखांची लाच स्वीकारताना अटक केली आहे. या घटनेमुळे महापालिका अधिकारी–कर्मचारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २७ गावातील एका अनधिकृत बांधकामावर कारवाई न करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांनी तक्रारदाराकडे ४२ लाख रुपयांची मागणी केली होती. त्यावर तडजोड होऊन ३५ लाख रुपये देण्याचे ठरले होते.

दरम्यानच्या, या काळात तक्रारदार यांनी ठाणे लाचलुचपत विभागाशी संपर्क करून या विषयी लेखी तक्रार दाखल केली होती. त्यांनतर ठाणे लाचलुचपत विभागाने आज दुपारच्या सुमाराला संजय घरत यांच्या दालनात व दालनाबाहेर सापळा रचला होता. या सापळ्यात घरत अलगद ८ लाखांचा पहिला हप्ता घेताना अडकला.

दरम्यान, घरतसह त्यांच्या कार्यलयातील २ लिपिकांची यात सहभागी असल्याच्या संशयावरून चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्राने दिली. घरत यांच्यावर यापूर्वीही पालिकेतील विविध विभागात अनेक गैरव्यवहाराच्या चौकशा सुरू आहे.