रेवदंडा येथे नियमबाह्य पर्ससीन मासेमारी करणाऱ्या नौकेवर कारवाई

मुंबई : पर्ससीन मासेमारीला प्रतिबंध करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘सजग अभियान’ अंतर्गत रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथे नियम बाह्य पर्ससीन मासेमारी करणाऱ्या नौकेवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 अंतर्गत कारवाई करुन 14 हजार रुपयांची मासळी जप्त करण्यात आली. तसेच नौका मालकाविरुद्ध अलिबाग तहसीलदारांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे, अशी माहिती मत्स्यव्यवसाय सहआयुक्त राजेंद्र जाधव यांनी आज दिली.