आता घरीच बनवा मुलांची फेवरेट ‘कुकीज’..

cookies

मुलांना ‘कुकीज’ हा प्रकार खूप आवडतो. पण घरच्या घरी कुकीज करायच्या म्हटल्यावर कित्येकांना दडपण येतो. मात्र या कुकीज करायला अतिशय सोप्या आहेत आणि अर्थात घरी केल्यामुळे त्यांचा स्वादही चांगला असतो. चला तर पहा कसा बनवावा हा पदार्थ…

साहित्य :-

  • १ वाटी बटर
  • १-१/२ वाटी साखर
  • २ वाटी पीठ
  • १ टीस्पून बेकिंग सोडा
  • १ टीस्पून इंसेस (तुमच्या आवडीनुसार)
  • चॉको चिप्स, बटरस्कॉच चिप्स

कृती :-  सर्वप्रथम एका बाऊलमध्ये बटर, साखर विरघळून घ्या. त्यानंतर बेकिंग पावडर, पीठ, व्हॅनिला इंसेस आणि थोडेसे पाणी टाकून मिक्स करा. नंतर त्याला मळून घ्या. आता त्यात सर्व प्रकारचे चिप्स मिक्स करा आणि त्याचे कुकीज बनवा. बेकिंग ट्रेमध्ये ठेवून १८० डिग्रीवर ७-८ मिनिटे बेक करा. तुमची कुकीज तयार!!!