निवृत्ती वेतनासाठी ‘आधार’ अनिवार्य नाही

नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन मिळण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य नाही, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. स्वयंसेवी संस्थांच्या स्थायी समितीच्या नुकत्याच झालेल्या तिसाव्या बैठकीत केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी ही माहिती दिली.

बँकेच्या बचत खात्यांशी आधार क्रमांकाची जोडणी केली नसल्याने निवृत्ती वेतन मिळण्यात अडचण येत असल्याच्या तक्रारी काही ज्येष्ठ नागरिकांनी केल्या होत्या. याबाबत या बैठकीत सिंग यांनी ही स्पष्टोक्ती केली.

केंद्र सरकारचे ४८.४१ लाख कर्मचारी असून ६१.१७ लाख किमान निवृत्तिवेतन मर्यादा आता ९००० रुपये करण्यात आली आहे, तर अंशदान हे २० लाखांपर्यंत ठेवले आहे. वैद्यकीय भत्ता महिना १००० रुपये आहे अशी माहिती त्यांनी दिली. सातत्यपूर्ण उपस्थिती भत्ता ४५०० रुपयांवरून ६७५० रुपये करण्यात आला आहे. निवृत्तिवेतनधारक आहेत. निवृत्ती वेतन मिळविण्यासाठी आधारसक्ती लागू नाही, असे ते म्हणाले. केंद्र सरकारने कर्मचारी व निवृत्ती कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने अनेक योजना लागू केल्या असून किमान नऊ हजार रुपये निवृत्ती वेतन हा त्याचाच एक भाग आहे, असे ते म्हणाले.