72 वर्षीय सासूचा सुनेच केला खून

धरणगाव : संजयनगर भागात राहणा-या मंजुळाबाई शिवाजी महाजन या 72 वर्षीय महिलेच्या खुनाप्रकरणी पोलिसांनी तिच्या सुनेला अटक केली असून न्यायालयाने 20 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलीसांनी संशयाची सूई मयत महिलेच्या घरातील सदस्यांकडे फिरवली होती. मयत वृद्धेची सून जनाबाई साहेबराव महाजन (वय ४८) हिला पोलीसांनी १४ रोजी संशयित आरोपी म्हणून अटक केली होती.

गुरुवार १२ रोजी अज्ञात चोरट्याने दहा ग्रँमच्या सोन्यासाठी वृद्धेचा गळा आवळून व डोक्याला मारुन खून केल्याची घडली होती. या प्रकरणी धरणगाव पोलीसांनी अज्ञात व्यक्ती विरुध्द खुनाचा गुन्हा दाखल झाला होता.

संशयित आरोपी असलेल्या सुनेला पोलिसांनी रविवारी एरंडोल न्यायालयात हजर केले. सरकारी वकील आर.एस.शिंदे यांनी संशयित महिलेच्या सात दिवसाची पोलीस कस्टडीची मागणी केली. आरोपी पक्षातर्फे अ‍ॅड.शरद माळी यांनी युक्तिवाद केला.