भंगाराच्या दुकानात आढळले सुमारे 5 हजार आधार कार्ड

जयपूर: राजस्थानची राजधानी जयपूर येथील एका भंगारच्या दुकानात सुमार 5 हजार आधार कार्ड मिळाले आहे. एका अज्ञाताने हे कार्ड 8 रुपये प्रति किलोच्या भावाने रद्दील लपवून विकले. भंगाराच्या दुकानात एका पोत्यात भरलेल्या या आधार कार्डांना बघून लोक हैरान झाले आणि घटनास्थाळी गर्दी जमली. काही स्थानिकांनी या पोत्यात आपला आधार कार्डसुद्धा मिळाल्याचे सांगितले. यानंत सर्व आधार कार्डांना पोत्यात बंद करून आधार एजंसी डीओआयटीच्या अधिका-यांकडे पाठविण्यात आले.

रद्दीत मिळालेल्या आधार कार्डाच्या सूचनेनंतर स्थानिक नगरसेवक इकरामुद्दीनसुद्धा घटनास्थळी उपस्थित झाले. मिळालेल्या माहितीनुसार रद्दीत विकण्यात आलेले आधार कार्ड मागील वर्षी पहिल्या तिमाहीत हक्कधारकांकडे जारी करण्यासाटी रवाना करण्यात आले होते. मात्र आधार नामांकन करणा-यांकडे पोचण्याऐवजी ते कार्ड भंगारवाल्याकडे गेले. या आधारकार्डची रवाना करण्याची तारीख जानेवारी 2017, मार्च व एप्रिल 2017 ही आहे.