धक्कादायक! नागपूर जिल्हा परिषदेच्या ४९ शाळांमध्ये मुख्याध्यापकच नाही

नागपूर : आपल्या देशातील शिक्षण व्यवस्था किती ढिसाळलेली आहे याची तुम्ही कल्पना ही नाही करू शकणार. नागपूरच्या जिल्हा परिषदेचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या भविष्याशी अक्षरशः खेळ सुरू आहे.

नागपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या तब्बल ४९ शाळांमध्ये गेल्या चार वर्षां पासून मुख्याध्यापकच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात ढकलले गेले आहे. या सर्व प्रकारा बाबत विचारले गेले असता. येत्या मे महिन्यात मुख्याध्यापकांची भरती करू, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात येत आहे. पण गेल्या चार वर्षांपासून शेकडो विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान कोण भरून काढणार हा अद्यापही यक्ष प्रश्न आहे.