फडणवीस सरकारची 3 वर्षे : अनेक अडथळ्यांना झुगारत प्रत्येक दिवस मजबूतीचाच

fadnavis

मुंबई: महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील देवेंद्र फडणवीस सरकारने आपल्या सत्तेची 3 वर्षे आज मंगळवारी पूर्ण केली असून या दरम्यान सत्तेत असलेला भगवा घटक पक्ष शिवसेनेने भाजप आपला जणू काही प्रमुख शत्रु असल्याप्रमाणे आरोप केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भाजपसोबत सत्ता भोगत असलेल्या शिवसेनेने सत्तेत असतानाही अनेक मुद्दांवर भाजपला अडचणीत आणले, हे मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर एक कठीण काम होते.

तथापि, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सेनेला फटकारताना म्हटले होते कि, आमच्या घटक पक्षाने हे आधी जाणून घेतले पाहिजे कि सत्तेत असताना सत्तारूढ आणि विरोधकाची भूमिका एकाचवेळी बजावता येत नाही. या आरोपांप्रत्यारोपांदरम्यान आज 31 ऑक्टोबर रोजी भाजप-शिवसेना सरकारने आपला 3 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे.

या दिवसाचा फायदा घेत शिवसेना नेते संजय राऊत यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची स्तुती करून सर्वाना आश्चर्याचा धक्काच दिला. ते म्हणाले कि, राहुल गांधींमध्ये मागील 3 वर्षांत बराच बदल घडून आला आहे. हे भाजपचे सरकार आहे. आम्ही मात्र सरकारमध्ये फक्त नावासाठीच आहोत. सेनेने काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसला विरोध करण्याऐवजी त्याच्या सहकारी पक्षालाच विरोध केला. तो (भाजप) आमचा प्रमुख शत्रु असल्याचे म्हणाले होते.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या दैनिकातील अग्रलेखात म्हटले आहे कि खरा नेता तो असतो जो जनतेला स्विकार्ह असतो. 2014 नंतर राहुल गांधीमध्ये बरेच परिवर्तन घडून आले असून त्यांना आता लोक त्यांना ऐकू लागले असल्याचे ते म्हणाले.

तथापि, दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपली परिपक्वता सिद्ध केली आहे. जेव्हा मुख्यमंत्री फडणवीस यांनी तीन वर्षापूर्वी सत्ता हाताता घेतली होती तेव्हा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील या अल्पमतातील आघाडी सरकारला त्याचे अस्तित्व कायम ठेवण्याचा प्रश्न विचारला जात होता. 228 सदस्यांच्या विधानसभेत सत्तापक्षाकडे 122 सदस्य होते. त्यांना सामान्य बहुमतासाठी 23 सदस्यांची कमतरता होती.

राष्ट्रवादी काँग्रेसने या सरकारला विनाअट पाठिंबा देऊ केला होता. यामागील कारण उघडच आहे कि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरीष्ठ नेत्यांच्या कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सुरु असलेल्या चौकशीबाबत वाटाघाटी करणे हे होते. शिवसेनेने भाजपविरुद्ध निवडणूक लढवून 63 जागा जिंकल्या होत्या आणि आपला पाठिंबाही जाहीर केला नव्हता. फडणवीस यांनी 31 ऑक्टोबर 2014 रोजी एका मोठ्या समारंभात मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावेळी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेसुद्धा उपस्थित होते. दुस-या महिन्यातच शिवसेना सत्तेत सहभागी झाली.

तीन वर्षाच्या कार्यकाळात फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने तुलनात्मकरित्या स्थिर सरकार दिले. त्यांनी आपल्या राजकीय क्षमतेच्या भरवश्यावर अनेक स्थानिक निवडणुकांत भाजपला यश मिळवून दिले. तथापि, सुरुवातीच्या काही काळात थोडीफार अनिश्चिंतता होती. नंतरच्या काळात मात्र शिवसेनेशी असलेले संबंध बिघडत गेले आता ते विरोधी पक्षासारखे झाले आहे. जेव्हाकि विरोधी पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेसुद्धा एवढ्या उघडपणे आपला विरोध समोर आणला नाही. 2016-17 च्या स्थानिक पातळीवरील निवडणुकीत भाजपला भरघोस यश मिळाले. मात्र फडणवीस सरकारसमोर शिवसेनेचे तसेच शेतीसंबंधीत नाराजीचे आव्हान कायम होते.

राजकीय समीक्षकांच्या मते मुख्यमंत्र्यांच्या जल संधारण योजना (जलयुक्त शिवार) आणि अलीकडील शेतक-यांची कर्जमाफी योजनेचा त्यांना मोठा लाभ मिळेल.

महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीसाठी दोन वर्षांचा कालावधी बाकी आहे. राजकीय निरीक्षकांच्या मते पुढे फडणवीस सरकारसमोर दोन गंभीर आव्हाने असेल. ते म्हणजे राज्यातील जातीच्या आधारावरील राजकारण तसेच भाजपतील पक्षांतर्गत आव्हान. कारण कि, ते रस्त्यावरचे राजकारणी नसल्याने या दोन आव्हानांना त्यांना सामोरे जावे लागू शकते.