मोदींच्या रॅलीत 14 हजार किलो हलवा आणि 9 लाख पुरी वाटप

रायपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज छत्तीसगडच्या दौ-यावर होते. त्यांनी रायपूर स्मार्ट सिटी येथे इंटीग्रेटेड कमांड सेंटरचे उद्घाटन केले. पंतप्रधानांनी भिलाई स्टिल प्लांटचासुद्धा दौरा केला आणि येथील लोकांना मार्गदर्शन केले. जयंती स्टेडियम येथील मोदींच्या रॅलीच्या दरम्यान 14000 किलोचा हलवा वाटण्यात आला. याशिवाय दीड लाख जेवणाचे पाकिटेसुद्धा वाटण्यात आले. जेवणाच्या सर्व पाकिटात 6 पुरी, हलवा आणि लोणचं होते. सभेत आलेल्या लोकांना बिस्किट, केळीसुद्धा देण्यात आले. दीड लाख जेवणाचे पाकिटे रायपुर, दुर्ग आणि राजनांदगाव येथे तयार करण्यात आले होते. सुमारे 9 लाख पु-या तयार करण्यात आल्या.

यासाठी 12 हजार किलोपेक्षा जास्त गहू, 2 हजार किलो सोजी. 4 हजार किलो साखर 6 हजार लिटर तेल, 1 लाख लोणच्याचे पाकिटे तसेच 600 किलो खडी साखर वेगवेगळे पदार्थ बनविण्यासाठी वापरण्यात आले. सभेसाठी सामील होणा-या पार्टी नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना कार पार्किंगसाठी समस्या येऊ नये म्हणून 35 पार्किग स्थळे बुक करण्यात आली. पंतप्रधान मोदी यांनी जंयती स्टेडियम येथून डिजीटल कोनशीला बसवण्यासोबतच विस्तार योजनेचे लोकार्पणसुद्धा करण्यात आले. यासोबतच पंतप्रधानांनी जगदलपूर विमानतळाचे लोकार्पणसुद्धा व्यासपीठावरूनच केले.

पंतप्रधानांची सुरक्षा लक्षात घेता एसपीजी इंटलिजंसशिवाय 4 हजारांपेक्षा जास्त जवान भिलाई येथे तैनात करण्यात आले होते. एक हजार जवान रायपुर येथे तैनात करण्यात आले होते. हेलिपॅड सभास्थळानजिकच बनविण्यात आले होते. जेथून येण्याजाण्यासाठी नवीन रस्ते तयार करण्यात आले होते. उल्लेखनीय आहे कि, नरेंद्र मोदी यांनी मागील तीन वर्षांच्या कार्यकाळात मोदींचा हा पाचवा छत्तीसगडचा दौरा आहे. छत्तीसगड येथे यावर्षी विधानसभा निवडणुका होणार आहे.