चैत्यभूमीवर भीमसैनिकांची गर्दी

मुंबई : महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची आज १२७ वी जयंती आहे.त्यानिमित्तानं डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मुंबईमध्ये चैत्यभूमीवर रात्रीपासून भीम सैनिकांनी गर्दी केली आहे. राज्यभरात आज आंबेडकर जयंती निमित्य विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

राज्यपाल सी. विद्यासागर राव आज चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेबआंबेडकरांना अभिवादन करतील. मध्यप्रदेशातील महू या डॉ.आंबेडकरांच्या जन्मस्थळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद स्मारकाला आदरांजलीवाहणार आहेत.