भुजबळ म्हणाले… ‘तुमने दिया दर्द ब्याज के साथ अदा करेंगे’

मुंबई : ‘जो दर्द तुम हमे किश्तो-किश्तो मे दोगे वो आलम क्या होगा जब हम उसे ब्याज के साथ अदा करेंगे’, असा शेर भुजबळांनी सादर करताना राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सुडाच्या राजकारणाचा इशारा दिला आहे.

दोन वर्षांपेक्षा जास्त काळ जेलमध्ये घालवल्यानंतर छगन भुजबळ यांना जामीन मिळाला आहे. आपल्याला जो टप्प्याटप्प्याने त्रास देण्यात आला, त्याचा सव्याज बदला घेईन, असा इशाराच भुजबळ यांनी दिला आहे. झी २४ तासच्या मुक्त चर्चा या कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. तुरुंगातून जामिनावर बाहेर आल्यानंतर त्यांची ही पहिलीच मुलाखत ठरली. यावेळी त्यांनी आपल्याला झालेल्या त्रासाची परतफेड करणार असल्याचे ठणकावले.