पर्यटकांना राजभवन पाहण्यासाठी बॅटरीवरील वाहन

मुंबई: राजभवन पाहण्याकरिता येणारी पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे (एमटीडीसी) पर्यटकांसाठी बॅटरीवर चालणारे वाहन देण्यात आले आहे. आकर्षण असलेले राजभवन हे ठिकाण अधिक विकसित करण्यासाठी सरकारतर्फे प्रयत्न करण्यात येत आहेत. पर्यटकांचा प्रवास आरामदायी आणि सुरक्षित होण्याकरिता हे पाऊल उचलण्यात आले आहे.

राज्यपाल चे. विद्यासागर राव यांचे अधिकृत निवासस्थान असलेले राजभवन हे सर्वांना हे ठिकाण पाहता यावे यासाठी आठवड्यातील 6 दिवस या वारसास्थळाची कवाडे खुली केली जातात. ही दोन तासांची भ्रमंती असून या सहलीत राजभवनात फेरफटका मारला जातो. राजभवनात पर्यावरणस्नेही भ्रमंती करण्यासाठी बॅटरीवर चालणारे हे वाहन नक्कीच उपयुक्त ठरेल.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे काही नैसर्गिकदृष्ट्या संवेदनशील ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. थंड हवेची ठिकाणे, किनारपट्टीवरील ठिकाणे आणि तीर्थस्थळांचा यात समावेश असून या ठिकाणी डिझेल किंवा पेट्रोलवर चालणाऱ्या गाड्यांना परवानगी देण्यात येणार नाही. केवळ बॅटरीवर चालणारी किंवा ई-वाहनानांचा या ठिकाणी परवानगी देण्यात येईल जेणेकरून या ठिकाणी शून्य प्रदूषण होईल.

यावर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्राचे सन्माननीय पर्यटनमंत्री जयकुमार रावल म्हणाले, “पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि मुंबईतीली हे वारसास्थळ अधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी राजभवनाकडे बॅटरीवर चालणार वाहन सुपूर्द करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.