भारतात दीक्षा घेणा-या बौद्ध भिक्षूंना चीनमध्ये

पेईचिंग : भारतात दीक्षा घेणारे भिक्षू फुटीरतावादी असून चीनमध्ये फुटीरतावादी विचार पसरवित असल्याच्या सबबीवर तिबेटच्या बौद्ध भिक्षूंच्या प्रवेशावर चीनच्या एका प्रांताने बंदी घातली आहे.

चीनमधील ‘ग्लोबल टाइम्स’ या वृत्तपत्राने दिलेल्या तिबेटमधून भारतात आलेल्या तरुणांना भारतात बौद्ध भिक्षू बनवले जाते. त्यानंतर त्यांना चुकीच्या पद्धतीने प्रशिक्षित केले जाते. त्यामुळेच या भिक्षुंना लिटयांग काऊंटीमध्ये प्रवेश बंदी करण्यात आली आहे. शिचुआन प्रांतातील लिटयांग काऊंटीमध्ये ही बंदी घालण्यात आली आहे. दरवर्षी काऊंटीमध्ये देशभक्तीचा क्लास घेतला जातो. त्यात सर्वश्रेष्ठ कामगिरी करणाऱ्यांना पुरस्कार दिला जातो. या क्लासमधील प्रत्येक व्यक्तीवर नजर ठेवली जाते. फुटीरतावादी विचारांच्या विद्यार्थ्यांवर खास करून लक्ष ठेवले जाते, असे सूत्रांनी सांगितले.
आम्ही दलाई लामांना फुटीरतावादी नेते म्हणून पाहतो.

त्यामुळेच त्यांनी दीक्षा दिलेल्या प्रत्येक बौद्ध भिक्षूंवर आमची करडी नजर आहे, असे येथील धार्मिक नेते झू वाईकुआन यांनी सांगितले.काही गुरुंना परदेशात १४ व्या दलाई लामांकडून बौद्ध धम्माची दीक्षा मिळालेली आहे.