शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या श्रीपाद छिंदमची जामिनावर सुटका

नाशिक/अहमदनगर: छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करणारा नगरचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याला जामीन मिळाल्याने त्याची नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाली आहे.त्यानंतर तो अज्ञातस्थळी रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

शिवाजी महाराजांच्या विरोधात अक्षेपार्ह वक्तव्य आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा छिंदमवर दाखल आहे. या दोन्ही गुन्ह्यात 15 हजाराच्या जातमुचलक्यावर जिल्हा सत्र न्यायालयाने छिंदमला सशर्त जामीन मंजूर केला आहे.

शिवजयंतीच्या काही दिवस अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान श्रीपाद छिंदमने केले होते. तेव्हा नगरचा उपमहापौर असून त्याच्या विधानाची ध्वनिफीत सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.यामुळे जनमानसातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या आणि छिंदमला उपमहापौरपदावरून काढून टाकण्यात आलं होतs. त्याला अटकही करण्यात आली होती. पुढे छिंदमला लोकांच्या विरोधापायी नगरच्या कारागृहातून नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात हलवण्यात आले होते.