शिक्षिकेला रुजू करून घेण्यासाठी लाच मागणा-या जि.प. च्या दोन अधिका-यांना अटक

अकोला: जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत 15 दिवसांपूर्वी सत्कार स्विकारणा-या दोन अधिका-यांना आज लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने(एसीबी) रंगेहात अटक केली.

शिक्षक बिंदूनामावली प्रक्रिया यशस्वीरित्या राबवल्याने पुरस्कार प्राप्त या दोन अधिका-यांनी शिक्षिकेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ट जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत 15 दिवसांपूर्वीच सत्कार स्वीकारणाऱ्या दोन वरिष्ठ अधिकार्‍यांनी आज मंगळवारी रूजू करुन घेण्यासाठी लाचेची मागणी केली होती.

कर्मचाऱ्यांनी लाच स्वीकारताच दबा धरुन बसलेल्या एसीबीच्या पथकाने शिक्षण विभागात धाव घेतली. पंचासमक्ष कर्मचाऱ्याने स्वीकारालेल्या नोटांची पडताळणी व ओेळख परेड केली. खातरजमा होताच दोन्ही कर्मचाऱ्यांना एसीबीने ताब्यात घेतले. कैलास वसुदेव मसने (वय-47, रा.मोठी उमरी, असोलकर वाडी, अकोला, पद-वरिष्ठ सहाय्यक) आणि रामप्रकाश आनंदराव गाडगे (वय-55,रा.गितानागर, अकोला) अशी एसीबीने अटक केलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

त्यानंतर संबंधित शिक्षिकेला पुन्हा रुजू करुन घेण्यासाठी आवश्यक त्या मदतीकरिता शिक्षण विभागातील त्या दोन कर्मचाऱ्यांनी एक हजार रुपयांची मागणी केली. याबाबत शिक्षिकेच्या पतीने एसीबीकडे तक्रार केली. एसीबीने तक्रारीची पडताळणी केली आणि मंगळवारी सापळा रचत कैलास वसुदेव मसने आणि रामप्रकाश आनंदराव गाडगे यांना अटक केली.