बंगळुरात काँग्रेसची पहिली यादी जाहिर

बंगळुरु: कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उम्मेदवारांची पहिली यादी जारी केली असून मुख्यमंत्री सिद्धारामैय्या चांमुंडेश्वरी येथून तर सिद्धरामैय्या यांनी त्यांच्या चिरंजीवांना चरूआ विधानसभेसाठी रिंगणात उतरवले आहे.

पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय निवडणुक समितीची (सीईसी) बैठक शुक्रवारी दोन वेळा झाली यात सदस्यांनी अनेक तास उम्मेदवारांच्या निवडीवर चर्चा केली. मात्र त्यांच्यात सहमती होऊ शकली नाही. आज पुन्हा बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे.

यापूर्वी शुक्रवारी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय निवड समितच्या बैठकीत सुमारे दोनशे जागावर उमेदवार ठरविले गेले. पक्षाने विद्यमान 9 आमदारांचे तिकीट कापले आहे. त्यांच्याजागी नवीन आणि युवा चेह-याला उम्मदेवार बनविला असून नामांकन प्रक्रिया सुरु होण्यापूर्वी तिकीट वाटपाची घोषणा करण्यात येईल.