न्यायधीशांनी पत्र परिषद टाळायला हवी होती : अॅटर्नी जनरल वेणुगोपाल

k-venugopal

नवी दिल्ली: अॅटर्नी जनरल के. के, वेणुगोपाल म्हणाले, सर्वोच्च न्यायालायाच्या न्यायधीशांमध्ये जो वाद निर्माण झाला आहे. त्यावर उद्यापर्यंत पडदा पडेल. न्यायाधीशांनी पत्रकार परिषद टाळायला हवी होती, असेही ते म्हणाले.

सर्वोच्च न्यायालायाच्या चार वरिष्ठ न्यायाधीशांनी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्चचिन्ह उपस्थित केले आहे. या पार्श्वभूमीवर के. के. वेणुगोपाल यांनी दीपक मिश्रा यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर वृत्तसंस्थेशी बोलताना वेणुगोपाल यांनी या वादावर पडदा पडेल, असे सांगितले.

न्यायाधीशांनी जी पत्रकार परिषद घेतली ती अनपेक्षित होती असे सांगून वेणुगोपाल म्हणाले,’शनिवारी सर्वोच्च न्यायालायाच्या न्यायाधीशांशी चर्चा करून मतभेद दूर केले जातील’ तसेच न्यायाधीशांनी सुसंवाद साधून काम करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ही पत्रकार परिषद टाळता आली असती, असे मतप्रदर्शन करताना सरन्यायाधीशांसकट सगळेच न्यायाधीश मतभेदाचे मुद्दे कायमस्वरूपी ‘निकाली काढतील, असे ते म्हणाले.

Facebook Comments