नीरव मोदीच्या पीएनबी घोटाळ्याचा धसका घेत रिझर्व्ह बँकेची एलओयुवर बंदी

मुंबई: नीरव मोदी यांनी केलेल्या कोट्यावधीच्या कथित पीएनबी घोटळ्याप्रकरणी रिझर्व्ह बँकेनी धसका घेत लेटर ऑफ अंडरस्टँडींग देण्यावरच बंदी घातली आहे. आयात करण्यासाठी मिळवण्यात येणा-या एलओयुवर खबरदारीचा उपाय म्हणून ही बंदी घालण्यात आली आहे.

आयातीच्या व्यापारासाठी बँकांच्या एलओयूचा वापर व्यापाऱ्यांकडून केला जातो. तर देशांतर्गत व्यापारासाठी लेटर ऑफ क्रेडिट म्हणजे लेटर ऑफ क्रेडित वापरले जाते. मात्र पीएनबी घोटाळ्याचा प्रभाव लेटर ऑफ क्रेडिवरही पडला आहे. अहमदाबादसारख्या व्यापारी केंद्र असलेल्या शहरामध्ये विविध खाजगी बँकांनी राष्ट्रीयीकृत बँकांकडूम जारी करण्यात आलेले लेटक ऑफ क्रेडिट घेण्यास नकार दिला आहे. बँकांच्या या धोरणामुळे गुजरातमधील व्यापाऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.