दिल्लीतील सिलिंग मुद्दावर आप आणि भाजपचे साटेलोटे : राहुल गांधी

नवी दिल्ली : राजधानी दिल्ली येथे सुरु असलेला सिलिंग वाद थांबण्याचे कुठलेही लक्षण दिसत नसताना राजकारण तापत आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि केंद्र सरकारच्या दरम्यान आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना या कोलाहालात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही उडी घेतली असून याप्रकरणात भाजप आणि आपच्य दरम्यान साटेलोटे असल्याचे राहुल यांनी म्हटले आहे.

काँग्रेस अध्यक्षांनी ट्विट करून म्हटले आहे कि दिल्ली येथे सिलींगच्या मुद्दावर आरोप प्रत्यारोपाचे नाटक बंद करण्यात यावे. या बनावटी लढाईत व्यापा-यांचे नुकसान होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दोन्ही पक्षांनी यामुद्दावर राजकारण करण्याचे सोडून लवकराता लवकर ही समस्या निकाली काढावी. जेव्हा की या मुद्दावर राहुल गांधी यांना आव्हान करताना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. कि त्यांनी (राहुल) हा मुद्दा लोकसभेत मजबूतीने उपस्थित करावा आणि भाजपवर दबाव तयार करावा. आम आदमी पार्टी त्यांचे स्वागतच करेल.

सध्या दिल्लीतील व्यापा-यामध्ये सिलींगच्या मुद्दावर असंतोष असून दोन दिवसांसाठी बाजार बंदचे आवाहन करण्यात आले आहे. मागील तीन महिन्यांपासून सुमारे 38000 दुकान आणि संपत्तीला सील केले गेले आहे. येत्या 14 मार्च रोजी अमर कॉलोनी आणइ लाजपत नगर येथील सर्व व्यापारी एकत्रितपणे सिलिंगची शवयात्रा काढणार आहे.